- 1 विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, 3 मोटार सायकल
माळशिरस : दिनांक 31.07.2020 रोजी रात्रौ 21.00 ते दिनांक 01.08.2020 रोजी 03.55 वा.दरम्यान कृष्णा बाबासाहेब सानप (वय 27 रा.पाडळी ता.शिरूर जि.बीड ) हे विजय हरीभाऊ पाखरे यांचेसह टाटा कंपनीचा दहा टायर ट्रक क्रमांक 11.।स्.0977 सह जात असताना त्यांची ट्रक जळभावी घाटाचे ठिकाणी आले नंतर अज्ञात 7 चोरटयानी 4 दुचाकी मोटार सायकली वरून आलेल्या रस्त्यावर आडव्या लावुन ट्रकचे काचेवर दगड मारून ट्रक चालक विजय हरीभाऊ पाखरे यांना डोक्यात दगड मारून करून कृष्णा सानप व विजय पाखरे यांना दगड व चाकुचा दाखवुन शिवीगाळी दमदाटी करून त्याचेकडील 20 हजार रोख रक्कम, 28 हजार 800 रूपये किंमतीचे ओप्पो व विवो कंपनीचे 2 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 48 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता म्हणुन कृष्णा बाबासाहेब सानप यांनी दिलेल्या फिर्यादी वरून माळशिरस पोलीस ठाणेस भादंवि कलम 395,397 प्रमाणे दिनांक 01.08.2020 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांनी स्थागुशा कडील कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करून त्यांना गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचा शोध घेऊन गुन्हयाची उकल करण्याच्या अनुषंगाने त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून माळशिरस भागात रवाना केले होते.
कार्यरत करण्यात आलेले विशेष पथकातील कर्मचारी हे दिनांक 11.08.2020 रोजी नातेपुते भागात पेट्रोलिंग करीत असताना स्थागुशाचे पोनि/अरूण सावंत यांना त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,.सदरचा गुन्हा हा सुरज वाघमोडे, विशाल पवार (दोघे रा.कळंबोली ता.माळशिरस) यांनी त्यांचे इतर साथीदार यांचेसह केला असून त्यापैकी संशयीत इसम नामे विशाल पवार, रामभाऊ सुर्यवंशी व सतीश रूपनवर हे दहीगाव चैक येथील हाॅटेल अमृततुल्य या ठिकाणी गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकलीसह थांबले आहेत.
मिळालेल्या गोपनिय बातमी प्रमाणे स्थागुशा कडील विशेष पथकातील कर्मचारी हे दहीगाव चैक येथील हाॅटेल अमृततुल्य येथे जाऊन बातमीची खातरजमा केली असता, तेंव्हा सदर ठिकाणी 3 संशयित इसम हाॅटेल अमृततुल्य च्या ठिकाणी थांबले असल्याचे दिसुन आले. त्यावेळेस त्या तिघांचा विशेष पथकातील कर्मचारी यांना संशय आल्याने त्या सर्वांनी त्या तिघांना गराडा घालुन पकडुन त्या सर्वांचे नाव, गाव, पत्ता विचारता त्यांनी आपली नावे 1) रामभाऊ श्रीमंत सुर्यवंशी (वय 23 रा.सुर्यवंशी वस्ती फडतरी ता.माळशिरस) 2) सतीश बापुराव रूपनवर (वय 24 रा.लोणंद ता.माळशिरस ) 3) विशाल दत्तात्रय पवार (वय 18 रा.कळंबोली ता.माळशिरस) अशी सांगितली. त्या सर्वांना माळशिरस पोलीस ठाणेस दाखल असलेल्या दरोडयाच्या गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस करता, सुरूवातीस त्यांनी उडवा उडवीचे व असमाधानकार उत्तरे दिली तेंव्हा त्या सर्वांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी त्याचे इतर 2 साथीदार याचेसह सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्याचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या मोबाईल पैकी 11 हजार 800 रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट, 55 हजार रूपये किंमतीच्या गुन्हयात वापरलेल्या 3 दुचाकी मोटार सायकल असा एकूण 72 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयित आरोपी यांना पुढील तपासकामी माळशिरस पोलीस ठाणेस सुपुर्द केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास माळशिरस पोलीस ठाणे यांचेकडुन होत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण सावंत यांचे नेतृत्वाखाली सपोफौ/शिवाजी घोळवे, पोहवा/नारायण गोलेकर, मनोहर माने, विजयकुमार भरले, मोहन मनसावाले, पोना/रवि माने चापोना/ केशव पवार यांनी बजावली आहे.