सोलापूर : रसना बाळु काळे (वय २१ रा.मोटेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर ) यांना दिनांक १६.०९.२०२० रोजी रात्री ०२.०० वा.सुमारास अज्ञात ४ आरोपी यांनी चाकुचा धाक दाखवुन त्याचे कपाटात ठेवलेले जीओ कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व १७ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता त्याबाबत माळशिरस पोलीस ठाणेस गुरनं ५११/२०२० भादंवि कलम ३९२,४५७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.माळशिरस पोलीस ठाणे कडुन सदर गुन्हयात आरोपी सुरज कुंडलिक जाधव (रा.जाधववाडी तामाळशिरस) सुरज दुर्योधन काळे (रा ५८ फाटा माळशिरस ) व सोमनाथ बाळु गोरे (रा.माळशिरस) यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करून त्याचेकडुन गुन्हयात वापरलेल्या ३५ हजार रुपये किंमतीच्या २ मोटार सायकली, ३ हजार रूपये रोख रक्कम, १ हजार रुपये किंमतीचा जीओ कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व गुन्हयात वापरलेला चाकु असा ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखे कडील कर्मचारी यांनी माळशिरस शहरातील पंढरपूर ते फलटण जाणारे रोडवर सर्टीफाईड मैदान माळशिरस येथे थांबलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेला १ हजार रूपये किंमतीचा जिओ कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केला आहे.अटक केलेले आरोपी सुरज कुंडलिक जाधव, सुरज दुर्योधन काळे व सोमनाथ बाळु गोरे यांनी नातेपुते व माळशिरस पोलीस ठाणेच्या हद्दीत एकूण ५मालाविषयक गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.