नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या ‘दंडा मार’ वक्तव्यावरुन त्यांना सुनावलं आहे. मला किती लाठ्या मारा. माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे. हे कवच मला काहीही होऊ देणार नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यात देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठी-काठीने चोपतील ” असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे.