माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे जसवंत सिंह यांनी देशाची कायम सेवा केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. अशी माहिती दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.