बारामती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांचा उपक्रम
मांदळी, ता. कर्जत, जि. अ.नगर : कृषी महाविद्यालय बारामतीच्या चतुर्थ वर्षात शिकणारे विद्यार्थी प्रथमेश खामकर, तन्मय अगवन, स्वराज जरांडे, आनंद गुडे, सौरव धाडसे, हर्षवर्धन चव्हाण, ओम भांगरे आणि दिनेश भोगम यांनी शेतकऱ्यांना नवीन व प्रभावी सापळे माहिती व्हावे या साठी सापळ्यांद्वारे कीटकांचे नियंत्रण प्रात्यक्षिक मांदळी येथील शेतकऱ्यांना दाखवले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) सापळ्यांद्वारे कीटकांचे नियंत्रण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
उपक्रमातून बाजारात उपलब्ध असलेले विविध प्रकारच्या कीटक सापळ्यांचे महत्तव व फायदे पटवून देण्यात आले. कीटक मुळे शेतकऱ्यांचे किटकांमुळे कमीत कमी नुकसान होते. व शेतकऱ्यांना याचा फायदा ही होतो. एकात्मिक किडनियंत्रण पध्दतीतील सापळे हे एक महत्वाचे साधन आहे. किटकनाशके व मजुरीवरील खर्चात बचत होते. फेरोमेन हे बिनविषारी असल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न उद्भवत नाही. हव्या असलेल्या किडींचेत नियंत्रण करता येत असल्यामुळे मित्र किडींना सुरक्षित राहतात तसेच हाताळण्यास अत्यंत सोपे व अतिशय सुरक्षित असतात असे शेतकऱ्यांना सांगितले. शिवाय वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण गरजेनुसार सापळे लावू शकतो असे ही सांगण्यात आले. या दरम्यान गावचे शेतकरी तसेच ग्रामस्थ प्रात्यक्षिक साठी उपस्थित होते. नवीन माहिती मिळाली व आम्ही देखिल शेतामध्ये सापळे लावू व कीटकनाशके कमी वापरू असा विश्वास शेतकऱ्यांनी विद्यार्थांना दिला. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल व माहिती दिल्याबद्दल विद्यार्थांचे आभार मानले. या उपक्रमात कार्यक्रम मुख्याधिकारी. प्रा. एस. पी. गायकवाड सर व प्रा. शरद दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.