आज रोजी महिला दिनाचे औचित्य साधून राघवेंद्र नगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीची आरती करून विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाग 26 च्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण ह्या होत्या सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ चंदाराणी ऐवळे, सौ पार्वती आमने, सौ शैला सूर्यवंशी, यांनी केले होते. सूत्रसंचालन सौ दिपाली कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन सौ सुनंदा कल्याणकर, कुमारी पूजा मोतीबने. यांनी केले यावेळी योगा टीचर सौ अनुराधा खारे यांची उपस्थिती होती यावेळी सौ कटारे, सौ लाल संगी,सौ स्वामी, सौ अंगडी, सौ कायपुरे, श्रीमती शिंदे, सौ पुष्पा जाधव, आदींसह असंख्य महिला वर्ग उपस्थित होते