सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त दीपक तावरे यांचा कारभार मनमानी आणि गलथान आहे. महापालिका प्रशासनावर त्यांचा कोणताही अंकुश नाही. काही विशिष्ट्य लोकांना व ठेकेदारांना घेऊनच त्यांचा कारभार चालू आहे त्यांच्या कामकाजा बद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यांच्या ह्या कार्यशैली मुळे करोना सोलापुरात दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे तातडीने सोलापुरात कार्यक्षम कर्तव्य दक्ष महापालिका आयुक्त नेमावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे