सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूर शहरातील संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानात काम करणार्या एका महिला कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आज रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आला आहे. बाळे भागात राजेश्वरी नगर परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला असून वैद्यकीय प्रशासनाने तत्परता दाखवून या महिलेच्या संपर्कात असणाऱ्यांच्या नोंदी घेण्याचे काम केले आहे.
नगरसेवक गणेश पुजारी यांनी या भागातील नागरिकांची भेट घेऊन त्या कुटुंबाच्या शेजारी असलेल्या नागरिकांना धीर दिला आहे तसेच प्रत्येक घराची आरोग्य तपासणी करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.