-
भोपाळ: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट कराव्यात तसंच क्वारंटाईन व्हावं, असं त्यांनी आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, माझ्या प्रिय देशवासियांनो, माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. कोरोनाची चाचणी घेतल्यानंतर माझा अहवाल सकारात्मक(पॉझिटिव्ह) आला आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी अहवान करतो की त्यांनी आपली कोविड-19 चाचणी करुन घ्यावी. शिवाय माझ्यासोबत संपर्क आलेल्या निकटवर्तीयांनी विलगीकरणात राहावे, असं चौहान ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी सर्व गाईडलाईन्सचं पालन करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला क्वारंटाईन करणार आहे. माझं राज्यातील जनतेला आवाहन आहे की, आपण काळजी घ्या. थोडासा हलगर्जीपणामुळे आपल्याला कोरोना होऊ शकतो. मी कोरोनापासून वाचण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र अनेक लोकं मला वेगवेगळ्या कारणांसाठी भेटत होती, असं त्यांनी म्हटलंय.