सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव हे सोलापूर जिल्ह्यातील 2000 हजार लोकसंख्या असणारे गाव या गावाने सरकारने रेशन कार्डावर धान्य दिले त्याबाबत या गावांतील सर्व गावकर्यांनी सर्वांना बरोबर घेत योजना आखली. रेशनच्या मीळणाऱ्या धान्यातुन काही वाटा गरजुनां देण्यासाठी ग्रामपंचायतींत जमा केला. आता महिनाभर पुरेल इतके धान्य सर्वांकडे झाले.आपल्या वाट्याचे दुसर्यालाही देणे तेही स्वतः तशाच परिस्थितीत असताना, हेच खरे दान व हीच खरी मदत…
तसेच, लॉक डाऊन च्या कठिन परीक्षेच्या सुरवातीच्या काळापासून गोर गरिबांना मदत करण्याच्या उद्देशाने गावातील काही तरुण झपाटले होते. त्यांना काही तरी समाजाचे देणे आहे या भावनेने काम करायचे होते. शिवराज जाधव यांचा मार्केटयार्ड मध्ये भाजी व्यापार आहे, त्यांनी गरीबांना मोफत भाजी च्या स्वरुपात मदत द्यायला सुरु केली. ते रोज एक रिक्षा ट्रॉली भरून भाजी देत आहेत.
या सर्व कामांत सरपंच ब्रम्हनाथ पाटील, शिवराज जाधव, ग्रा. पं. सदस्य किसन नागटिळक, ग्रामसेवक नागसेन कांबळे, नीलकंठ पाटील, बालाजी जाधव, अशोक काकडे, विष्णु केत, बाळासाहेब बनसोडे, भारत कोळेकर व सर्व तरूण व मार्गदर्शक यांनी त्यांच्या विचारांनी सहभाग नोंदविला आहे.