सोलापूर,दि.3: जिल्ह्यातील शेततळ्यामध्ये मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि इच्छुक शेतकऱ्यांना मत्स्यपालन व्यवसायातील तांत्रिक माहिती होण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे ऑनलाईन प्रशिक्षणाचे (वेबिनार) आयोजन केल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांनी सांगितले. हे प्रशिक्षण 5 सप्टेंबर 2020 ला सकाळी 11 वाजता होणार आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणात रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे मत्स्यबीज सोडणेपूर्वी शेततळ्यातील पूर्वतयारी, मत्स्यबीज वाहतूक आणि साठवणूक, पानकिटकांचे नियंत्रण, जीवंत खाद्य आणि प्लवंग निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
वेबिनारसाठी (प्रशिक्षण) झूम ॲपद्वारे जॉईन होता येईल. यासाठी मिटिंग आयडी-7753873970 आणि पासवर्ड-12345 असा आहे. अधिक माहितीसाठी सचिन चव्हाण (8975269977), सुहास ढवळे (9890299733), युवराज बिराजदार (9921233443) यांच्याशी संपर्क साधावा.
इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन वेबिनारचा लाभ घेण्याचे आवाहन मुकणे यांनी केले आहे.