शंकरलिंग कुंभार/कलकर्जाळ : दक्षिण सोलापूर तालुका येथील मंद्रुपच्या परिसरामध्ये काल रात्री झालेल्या पावसाने ऐतिहासिक नोंद केलीं आहे. याचा मंद्रुप व आसपास परिसरातील गावांना मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले आहे. निंबर्गी, लवंगी, बाळगी, सादेपुर, कुरघोट, टाकळी, भंडारकवटे, नांदणी, येळेगाव, विंचूर, कुंसुर, बरूर, हतंरसंग कुडल या गावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पांणी आल्याने शेतकऱ्यांच्या शेतात बांध फुटून मोठे नुकसान झाले असून पिकानां देखील याचा फटका बसला आहे. मंद्रुप मधील दोन तलाव पावसामुळे भरले असून अनेक रस्त्यावर पाऊसाचे पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. तेरामैल ते औराद व कुरघोट ते माळकवटे या रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने हा रस्ता देखील बंद झाला आहे.