सोलापुरः मंगळवेढा शहरातील रविकिरण बिअरबारच्या पाठीमागे खुल्या जागेत मन्ना नावाचा पैशावर जुगार खेळणार्या 17 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून तब्बल 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.दरम्यान ही कारवाई पोलिस अधिक्षक ग्रामीणच्या विशेष टिमने केल्याने अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेची हकिकत अशी की, यातील पोलिस निरिक्षक विनय बहिर,पोलिस शिपाई मनोज राठोड,सतीश यनगुले,लक्ष्मण हेमाडे,शैलेश जाधव आदी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे विशेष पथक दि. 7 रोजी सायंकाळी 6.00 वा. मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबर्यामार्फत रविकिरण बिअरबारच्या पाठीमागील खुल्या जागेत काही इसम पैज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता यातील आरोपी
विक्रम शामराव शेंबडे (वय 34),
संजय सुरेश मोरे(वय 42),
संदेश सिध्देश्वर काळुंगे (वय 29),
अमोल कृष्णा मुदगूल (वय 29),
योगेश यल्लाप्पा कट्टे (वय 49),
संदिप हरी पडवळे(वय 34),
विजय जयवंत कट्टे-पाटील(वय 53),
ज्ञानेश्वर शामराव इंगळे(वय 35),
बालाजी अशोक इंगळे(वय 30),
सचिन भाऊ चेळेकर (वय 34),
नागराज आडव्याप्पा होनमोरे (वय 40),
सागर शिवाजी डांगे(वय 21),
निखील बाळासाहेब कोळी(वय 24),
अनिल सिध्देश्वर डांगे(वय 40),
गणेश शिवाजी निचळ(वय 25),
बाळू भिमाशंकर बुधवंतराव(वय 55)
सर्वजण राहणार मंगळवेढा,
मधुकर ज्ञानदेव शिंदे(वय 36 रा. डोंगरगांव)
आदीजण गोलाकार बसून मन्ना नावाचा पैशावर हार जीतचा खेळ खेळत असताना पोलिस पथकाला मिळून आले.यावेळी पोलिसांनी रोख रक्कम, 5 मोटर सायकली असा एकूण 2 लाख 85 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसंानी जप्त केला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अवैध धंदे पुर्णतः हद्दपार झाले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा शहर व ग्रामीण भागात अवैध धंदयाने डोके वर काढले आहे.सध्या शहर व परिसरात जवळपास 14 जुगार अड्डे सुरु असल्याची चर्चा पोलिसांच्या छापेमारीनंतर शहरामध्ये सुरु होती.महिन्याकाठी मंथली म्हणून प्रत्येकाकडून अंदाजे 30 हजार पोच खाकी वर्दीला होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.सोलापूर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे पथक मंगळवेढयात येवून अवैध धंदयावर धाडी टाकत असतील तर इथले स्थानिक शहर बीटचे पोलिस नेमके काय करतात असा सवालही जनतेमधून विचारला जात आहे. अवैध व्यवसायाची माहिती सोलापूर ऑफिसला कळत असताना येथील पोलिसांना का कळत नाही असा सूरही आता शहरवासियांमधून उमटत आहे.जुगाराबरोबर मटक्यानेही डोके वर काढण्यास प्रारंभ केला आहे. आता तो चिठ्ठीऐवजी व्हॅाटसअॅपच्या माध्यमातून देवघेव सुरु असल्याचे बोलले जात आहे.लॉकडाऊन संपल्यामुळे बंद कालावधीमधील उणीव भरून काढन्यासाठी पाेलीस प्रशासनाच्या मुख संमतीने सर्व काही आलबेलपने सुरू असल्याचाही सूर आता निघू लागला आहे.पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून यापुढेही या कारवाईत सातत्य रहावे अशी मागणी सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांतून पुढे येत आहे.