- वाढदिवसाचा खर्च टाळून 71 हजाराचा धनादेश सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे
सोलापूर : त्र्यबकेश्वर ते पंढरपूर असा संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखीचा प्रवासखर्च एसटी महामंडळाने जमा करून घेतला त्याचा संताप व्यक्त न करता संवेदनशीलता दाखवून भारतीर जनता पक्षाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी तातडीने 71 हजाराचा धनादेश सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुर्पुद केला.
दक्षिण काशी समजल्या णाऱ्या सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी आषाढी वारीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील संताच्या पालख्या हजारो वर्षापासून पंढरपूरमध्ये येतात. परंतु यंदाच्रा आषाढी वारीदरम्रान कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याने प्रशासन आणि शासनाने वारीची परंपरा खंडीत न करता काही नियम अटी घालून पालखी सोहळ्या ला परवानगी दिली. एसटी महामंडळाच्या बस मधून मोजक्या वारकऱ्यासह पालखी पंढरपूरकडे आणण्यास परवानगी देण्यात आली त्यानुसार संत निवृत्तीनाथ महाराज यांची नाशिक त्र्यबकेश्वर येथून पंढरपूरकडे एसटी बसने पालखी आली. त्या पालखीचा प्रवासखर्च म्हणून एसटी महामंडळाने 71 हजार रूपये संत निवृत्तीनाथ देवस्थानकडून वसुल केले. देवस्थानचे अध्यक्ष भुतडा यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला विनंती केली तरी त्याची विनंती मान्य केली नाही या बाबतचे वृत्त प्रसारमाध्रमातून आल्यावर सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी संवेदनशीलता दाखवून आणि घरातील वारकरी सांप्रदायाची परंपरा असल्याने त्यांनी मनोमन विचार करून संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान अध्यक्ष यांना फोनवरून माहिती विचारली त्यावरून त्यानी पालखीच्रा प्रवासाचा जो खर्च शासनाकडे जमा केला आहे तो आपण देण्रास तयार आहोत असे सांगितले त्या वरून तातडीने अनंत जाधव यांनी त्यांचा शनिवार दि. 4 जुलै रोजीचा वाढदिवसाचा खर्च टाळून वैयक्तिकरित्रा 71 हजार रूपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यासाठी गेले परंतु जिल्हाधिकारी नसल्याने त्यांनी डेप्युटी चिटणीस अमरनाथ भिंगे यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. यावेळी संदीप जाधव, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, सागर नागीनकेरी, विकी बाबा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
- हेलिकॉप्टरमधून पालखी आणू म्हणणाऱ्या शासनाने एसटीचेही भाडे घेतले, हे वाईट आहे – अनंत जाधव
महाराष्ट्राचे ऊर्जास्त्रोत असलेल्या पांडुरंगाच्रा भेटीसाठी आणि आषाढी वारीसाठी येणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचा प्रवासखर्च घेवून आघाडी सरकारने आपली असंवेदनशीलता दाखवून दिली. भाजप सरकारने मागील वारीत वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप आणि विविध सोई सुविधा दिल्या यंदाच्या वारीला कोरोनाचे सावट असूनही वारी पार पडली परंतु शासनाने हेलिकॉप्टरमधून पालखी पंढरपूरला आणू अशी गर्जना केली परंतु एसटीमधून आलेल्या पालखीचे भाडेही सोडले नाही ते जमा करून घेतले हे वाईट वाटते माझ्या घरी वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे मला वारीचे महत्व माहित आहे म्हणूनच मी माझ्रा वाढदिवसाचा खर्च टाळून पालखीच्या प्रवासाचे भाडे शासना मार्फत संत निवृत्तीनाथ देवस्थानकडे पाठवले आहे.