सोलापूर : कांडी कोळशाचा विषय येण्याचे कारण आहे ब्लॅक डायमंड हा माहितीपट… कांडी कोळशासारख्या विषयावर बनविलेला माहिती पट किर्लोस्कर कंपनी आयोजित वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे तसेच सोलापूर येथे दाखविण्यात आला. या माहितीपटाचे निर्माते, दिग्दर्शक विश्वास शेंडगे यांनी चक्क मोबाईलवर या चित्रपटाचे शुटीग केले आहे. महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ, मुंबई आयोजित वसुंधरा पर्यावरण चित्रपट महोत्सवातही ब्लॅक डायमंड दाखविण्यात आला.
दगडी कोळशाला पर्याय कांडी कोळसा हवेमधील कार्बनचे कमी प्रमाण करण्याचे प्रयत्न, कृषी टाकावू पदार्थांपासून तयार केला जातो. कांडी कोळसा, द्राक्षाच्या कांड्या, डाळींबाच्या जळालेल्या बागा, कृषी टाकावू लाकडे आदीपासून कांडी कोळसा तयार करतात. कांडी कोळसा बनविण्याचा कारखाना एल.एन.बायोमास प्रॉडक्ट, टेंभूर्णी येथील एमआयडीसीमध्ये सुरू झाला. या कारखान्यात संसारोपयोगी प्रदूषणविरहीत कांडी कोळसा अर्थात ब्लॅक डायमंड बनविणे सुरू आहे. युरोपियन देशांमध्येही याची चांगली मागणी आहे.
- निर्माता/दिग्दर्शक
विश्वास शेंडगे (मो.8888044073)