सोलापूर : आज रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशानुसार आ. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे NRU (national Ragistar Unemployment) बेरोजगार रजिस्टर बनवावे या मागणी साठी पोस्टर प्रदर्शित करून बेरोजगार युवकांसाठी 8151994411 हा क्रमांक जाहीर केला आहे त्या मोबाईल नंबर वर मिस कॉल देऊन नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक निरीक्षक, सासवड चे नगरसेवक गणेश जगताप, सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे, बारामती चे युवक अध्यक्ष संभाजी देशमुख, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, पंडित सातपुते, राहुल वर्धा, विवेक कन्ना, योगेश मार्गम, सैफन शेख, नितीन शिवशरण, मुश्ताक बेन्नीशिरूर, ओमकार गायकवाड, तिरुपती परकीपंडला, राजासाब शेख, अमोल भोसले, प्रवीण जाधव, आरिफ पठाण आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले मोदी सरकारने NRC व CAA कायदा आणला आहे एका बाजूला आपण पाहतो पाकिस्तानातून आलेला अदनान सामी ला मोदी सरकार भारताचा सर्वोच्च पुरस्कार पदमश्री बहाल करत आहे त्याला नागरिकत्व दिले आहे कारण इथे पहिल्यापासून एक प्रोसेस आहे त्याचे कायदेही अगोदरपासून आहेत. अश्या कायद्यामुळे पाकिस्तान काय जगातील कुठलाही माणूस भारताचा नागरिक बनू शकतो अशी नियमावली असताना NRC किंवा CAA ची काय गरज आहे मोदी सरकार मूळ प्रश्नांना बगल देऊन जनतेचे ध्यान भटकाविण्याचे काम करत आहे तसेच जातीधर्मामध्ये भांडणे लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने जी घटना या देशाला मिळाली त्या राज्यघटनेचा गळा घोटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. सध्या देशात मंदीचे सावट आहे. शिकलेल्या तरुणांना नोक-या नाही, उद्योग बंद पडत आहे बेरोजगारी वाढत आहे.
यासाठी सिएए, एनआरसीची गरज नसून NRU (National Register Unemployment) बेरोजगारी रजिस्टर बनवण्याची गरज आहे
अशी मागणी युवक काँग्रेसने मोदी सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र युवक कॉग्रेसने बेरोजगार व सुशिक्षित युवकांसाठी 8151994411 हा मोबाईल क्रमांक दिला आहे या नंबरवर मिस्ड कॉल करून बेरोजगार नोंदणी करायची आहे.याची माहिती सरकारला पाठवली जाणार आहे.
म्हणून युवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाविद्यालय, विद्यापीठ, सार्वजनिक ठिकाणी युवक कॉग्रेसचे कार्यकर्ते जाऊन युवकांची भेट घेवून जनजागृती करत दिलेल्या मोबाईल क्रंमाकावर मिस्ड कॉल करायला सांगावे असे विचार यावेळी सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास सुभाष वाघमारे, बाबुराव क्षीरसागर, संतोष अट्टेलूर, महेश लोंढे, संजय गायकवाड, सचिन शिंदे, नागेश म्याकल, बबलू बागवान, शाहू सलगर, शरद गुमटे, सागर राठोड, विकास राठोड, अविनाश खरटमल, प्रशांत गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, विश्वास गज्जम, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.