सोलापूर : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून एकूण 21 व्यक्तींच्या नावाची घोषणा झाली आहे. यातील एकूण 3 महाराष्ट्रीयन व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. ‘मदर ऑफ सिड्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे ह्या पद्मश्री पुरस्काराच्या एक मानकरी ठरल्या असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
आज संकरित बियाणांचा अतिशय वापर वाढलेला असताना राहीबाई पोपरे यांनी देशी आणि पारंपरिक बियाणांचं संकलन करत बियाणांची बँक तयार केली. त्यांनी देशी वाणांच्या बियाणांच पारंपरिक पद्धतीनं सवर्धनं केलं. आज राहीबाई यांच्या सीड्स बँकमध्ये तब्बल ५४ पिकांचे ११६ जातींचे वाण आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बियाणाविषयीची माहिती राहीबाईंना तोंडपाठ आहे.
सण 2014 पासून केंद्रातील मोदी सरकारने खऱ्या हकदारांना पद्म पुरस्कार दिले असून आता पद्म पुरस्कार वशिल्याने नाही तर कर्तृत्वाने मिळतील हे मोदी सरकारने दाखवुन दिले आहे. 2019 ला सुद्धा गरीब पण कर्तृत्ववान व्यक्तींना मोदी सरकारने पद्म पुरस्कार दिले होते. ज्या व्यक्तींचा साधा परिचय सुद्धा देशाला नव्हता, जे गरीब होते पण कर्तृत्ववान होते, ज्यांनी आपल्या असामान्य कामाने समाजासाठी नाविन्यपूर्ण काम केलं त्यांना पद्म देऊन मोदीनी दाखवून दिले की सरकार हे सामान्य माणसाला समर्पित आहे.