HSC Results 2020 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येईल. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदा कोकण विभागानं बाजी मारली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ४.७ टक्क्यांनी वाढला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.
⭕ निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?
- > www.mahresult.nic.in
- > www.hscresult.mkcl.org
- > www.maharashtraeducation.com