सोलापूर, (प्रतिनिधी):- येथील बांधकाम व्यावसायिकाला दुकान गाळा आणि फ्लॅट देतो म्हणून 85 लाख घेऊन फसवणुक केल्याची घटना उघड झाली.
सुहास गुरप्पा हुंबरवाडी (रा. बी1/702, बिल्डींग ए- 3 प्लॅट नं.203, सुवर्णरत्न गार्डन्स सहकारी रचना, कर्वे रोड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या नावाने सोलापूर महानगर पालिका हदद्दवाढ भागातील मिळकत जुना सर्व्हे नं. 312, नवीन सर्व्हे नं.130 मधील खुल्या जागेतमध्ये हिस्सा क्रमांक 06 यातील 20 हजार चौरसफूट जागा सुभाष नागनाथ जाधव (वय 51, रा. 26, अ, निरापाम सोसायटी विजापूर रोड सोलापूर) यांना विक्री करणार होते परंतु त्या जागेवर सोलापूर महानगर पालिकेचे आरक्षण होते आरक्षण काढल्यानंतर जागेचे खरेदीचे व्यवहार होणार होते परंतु ते झाले नाही म्हणून आरोपीच्या मालकीचे हदद्दवाढ भागातील जुना मिळकत सर्वे नं. 312, नवीन सर्व्हे नं. 130 मधील प्लॉट नं.1 ते 6 व 63,64 मध्ये बांधकाम केलेल्या अचल स्क्वेअर या नावाने असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील शॉप नं. 2 चटई क्षेत्र 178.96 चौरस मिटर इतके दुकान गाळा आणि त्याच इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेला 87.97 चौरस मिटरचा फ्लॅट नं. 8 या दोन्ही जागा 85 लाख रूपये देवूनदि. 10 फेब्रुवारी 2014 आणि दि. 16 नोव्हेंबर 2015 या दोन दिवशी दोन्ही जागेची खरेदी झाली परंतु या दोन्ही जागांच्या सात बारा उताऱ्यावर दोन वेगवेगळ्या कंसात मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेशान्वये फेरबदल करू नये असे स्थगिती आदेश व लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी बेळगांव यांचे कर्ज बोजा असे नमूद केलेले होते. यावरून आरोपी सुहास हुंबरवाडी यांनी बनावट कागदपत्रे तयार करून दुकान गाळा आणि फ्लॅट ची खोटी खरेदी देवून 85 लाख रूपये घेवून फसवणुक केली असल्याची फिर्याद सुभाष जाधव या बांधकाम व्यावसायिकाने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी सुहास हुंबरवाडी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.