जालना : अंबड तालुक्यातील दहिगव्हान येथे गावात प्रवेशद्वारावर ग्रामपंचायत कोरोना विषाणू खबरदारीचा उपाय म्हणून चेकपोस्ट लावलेच नाही ग्रामपंचायतने चेकपोस्ट सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे . सध्या लाकडाऊन असल्यामुळे जिल्हा बंदी आहे . अनेक जिल्ह्यांत अडकलेले नागरिक परत गावाकडे येतं असल्याने ग्रामीण भागात चित्र दिसत आहे . मागील अनेक दिवसांपासून नागरिक गावात परतु लागले आहे . त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . दहिगव्हान सह पचंकृषिशीतील बाहेर गावी असलेले नागरिक परत येत आहे . तसेच १ मे पासून आज पर्यंत गावात जवळपास अनेक नागरिक आले . गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना चेकपोस्ट वरुन गावात प्रवेश करावा लागत असल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही . यानंतर संबंधितांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वैद्यकीय अधिकारी करीत नसून त्यांना गावाबाहेर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत क्वांराटाईन केले जात . परंतु २३ मे पासून ग्रामपंचायतने चेकपोस्ट बसवले नसल्याने परजिल्ह्यातुन येणारे नागरिक गावात प्रवेश करत आहेत . जे सध्या दहिगव्हान सह परिसरातील अनेक गावांसाठी मोठे धोकादायक आहे . कारण चेकपोस्ट बंद नसल्यामुळे गावात आलेल्या नागरिकांपैकी एकाही नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेला नाही .आता मात्र कोणी नवीन आलेल्या नागरिकांची दक्षता घेत नाही . परंतु आतापर्यंत अंबड तालुक्यात रेड झोन मधुन आलेल्या नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णांचा संबंध परजिल्ह्यातील रेड झोन पासुन असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचे चित्र दिसत आहे . त्यामुळे आवश्यकता असताना ग्रामपंचायतने चेकपोस्ट न लावल्याने बाहेर गावावरुन रेड झोन मधुन गावात येणाऱ्या नागरिकां पासुन धोका निर्माण झाला आहे.संरपंच व ग्रामपंचायत जाणुन बुजून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा गावातील नागरिकात व सोशल मिडिया वर होत आहे