सोलापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम अंतर्गत सोलापूर येथील कृषीकन्या त्रिवेणी सिद्धार्थ पांढरे यांनी फायदेशीर व हानिकारक किटकांविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांसाठी कोणते किटक फायदेशीर असतात व त्या किटकांचे पिकांवर आणि जमिनीवर काय उपयोग होतो याबाबत माहिती दिली.तसेच हानिकारक किटक कोणते असतात व त्यांचे नियंत्रण कसे करावे याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी गावातील आदि शेतकरी व महिला उपस्थित होते. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचाये समन्वयक – डॉ . डी.पी. कोरटकर,प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.अडत, प्रा. डी.एस.मेटकरी,डाॅ.डी.एस.ठवरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला.