सोलापूर : सोलापूरात कोरोना विषाणूचा (कोविड – १९) संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रिसिजन समूहाकडून राखीव पोलिसांना पीपीई किट देण्यात आले आहेत.राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्र. १० अंतर्गत कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी २०० पीपीई किट्स प्रिसिजनकडून देण्यात आले. शनिवारी सोरेगाव येथील मैदानावर राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक आर. बी. केंडे, सहायक समादेशक सुभाष सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार टिंगरे, प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांच्या उपस्थितीत या किट्सचे वितरण झाले. या मदतीबद्दल राज्य राखीव पोलिस दलाने प्रशंसापत्र देऊन प्रिसिजन समूहाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.