सोलापूर : आज १० सप्टेंबर रोजी प्रभाग 26 मधील सुभाष शहा नगर येथे गुंठेवारी निधीचा पाठपुरावा करून नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पिण्याच्या पाईप लाईनचे व अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन केले. यावेळी येथील नागरिकांनी सांगितले की गेल्या वीस वर्षापासून आम्ही येथे राहात आहोत परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या परंतु आम्ही नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्याचे आम्हाला समाधान वाटत आहे. गेले वीस वर्षापासून आम्ही विकास कामापासून वंचित होतो आता आम्हास खऱ्या अर्थाने विकास कामे करणाऱ्या नगरसेविका मिळाल्या आमचे मत व्यर्थ गेले नाही असे सदर नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वनकुद्रे , मकानदार, पंडित भिमननवरु, सुभाष मोरे, संतोष माने, भगवान फन्दे, परशुराम जाधव, अमोल गोसावी, ठेकेदार प्रकाश चव्हाण, विजय चव्हाण व सुभाष शहा नगरातील नागरिक उपस्थित होते.