सोलापूर : सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 22 येथे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत रामवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंदात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीराचे उदघाटन राष्ट्रवादी गट नेते नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका पुनम बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, यावेळी उपस्थित, वैद्यकीय अधिकारी, आडके, देगांवकर, डाॅ.जोशी, डाॅ. जोग, डाॅ. चव्हाण, डाॅ. शिनगारे त्याच प्रमाणे या आरोग्य शिबीराचा लाभ घेण्यासाठी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रभागातील गैबीपीर नगर येथे भांडवली निधी साडेसहा लाख रुपये खर्चून माशाळकर घर ते प्रमिला स्वामी घर तसेच समद शेख घर ते हरुण शेख, घरापर्यंत पिण्याचे पाण्याचे पाईप लाईन टाकण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विष्णू गायकवाड, नागनाथ जाधव, अल्लाबक्ष शेख ,समद मिस्तरी, मोहम्मद पटेल, सिद्धू गायकवाड, हरुण शेख, जितेश भोसले, रवी गायकवाड, यमनुर गायकवाड ,बुडन पटेल , सुनीता बिराजदार आदी उपस्थित होते.