नवी दिल्ली : आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.
कृपया या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं असा सल्ला पाटील यांनी दिला. आपल्याला काही होणार नाही असं समजून कोणीही घराबाहेर बाहेर पडू नका. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. पोलीस देखील एक माणूस आहे. त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणं योग्य आहे, असंही त्यांनी नमूद केलं.