येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ ते २०१९ या काळात एकूण ५८ देशांचे दौरे केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर एकूण ५१७.८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंगळवारी राज्यसेभत ही माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी पंतप्रधान मोदींनी २०१५ ते आजच्या तारखेपर्यंत किती परदेश दौरे केले आणि त्यासाठी किती खर्च आला यासंदर्भात संसदेत लेखी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
“पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौऱ्यांमधील सुसंवादांमुळे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरील भारताच्या दृष्टिकोनाची इतर देशांना माहिती मिळाली आहे. परदेश दौऱ्यांमुळे व्यापार,गुंतवणूक, तंत्रज्ञान, सहकार, संरक्षण आणि जनसंपर्क इत्यादी क्षेत्रात इतर देशांसोबत दृढ झाले आहेत. या संबंधामुळे आपल्या आर्थिक विकासात वाढ आणि नागरिकांच्या कल्याणास चालना मिळाली आहे. तसेच भारताच्या राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यामध्ये योगदान दिले आहे” असे व्ही. मुरलीधरन म्हणाले.