सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावचे सुपुत्र व महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडीचे रसायनशास्त्रचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर माणिक सिरसट यांना ४ जुलै २०२० रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरची “डिझाईन अॅन्ड सिन्थेसिस अॉफ थायाझोल बेस्ड बायोॲक्टीव हेटेरोसायकल” या प्रबंध विषयावर पीएच.डी. पदवी मिळाली.
त्यांना सांगोला कॉलेज, सांगोला चे प्राचार्य डॉ. एम. टी. बचुटे यांनी संशोधक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व कुटुंबीय, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडीचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे सर व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते व जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बळीराम काका साठे यांनी ही अभिनंदन केले