सोलापूर,दि.15: गेल्या दोन तीन दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची माहिती कृषी विभागास तात्काळ कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
त्यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यांनी अधिसूचित पिकाचे नुकसान झाले. असल्यास 72 तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनीस किंवा कृषी विभागास दयावी. नुकसान कळवताना सर्व्हे क्रंमाक, नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळवणे बंधनकारक आहे. शेतक-यांनी नुकसानीची माहिती कळवल्यास विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी यांचा समावेश असणारी समिती नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल.
ज्या शेतक-यांचे नुकसाने झालेले आहे अशा शेतक-यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance हे ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती दयावी किंवा 18001037712 या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर माहिती दयावी असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.