सोलापूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी व आपली सुरक्षितता जपण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रभाग क्र. 24 मधील कल्याण नगर मधील 200 कुटूंबाना प्रत्येकी 5 याप्रमाणे 1000 मास्क चे नगरसेविका संगीता जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सोबत कोरोनाबाबतचे माहिती पत्रक, कोरोना जनजागृती करणारे वॉल स्टिकर्स व रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी, घ्यावयाची काळजी याची नगरसेविका संगीता जाधव यांनी माहिती दिली. यावेळी प्रारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश जाधव, रविकांत व्हनकोळे, मनपा आरोग्य विभागाचे वाघमारे साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते.