मुंबई : करोना आणि आर्थिक विकासाची निराशाजनक आकडेवारीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सकाळपासून जोरदार विक्री सुरु केली आहे. यामुळे सेन्सेक्स ६५० अंकांनी कोसळला. निफ्टीत १४० अंकांची घसरण झाली आहे. अवघ्या तासभरात गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका बसला आहे.सध्या बाजारात सर्वच क्षेत्रात जोरदार विक्री सुरु आहे. एच.डी.एफ.सी., रिलायन्स, आय.सी.आय.सी.आय. बँक, कोटक बँक, टी.सी.एस., आय.टी.सी., एस.बी.आय. आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठे अवमूल्यन झाले.रुपया ७३.४७ रुपयांवर बंद झाला. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घसरण ठरली. अमेरिका-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजाराने ठोसपणे व्यापार केला. युरोची विक्री करताना युरोपियन मध्यवर्ती बँकेसमोर चिंता होती, पण अमेरिकी डॉलरने आजच्या सत्रात नफा कमावला. आजच्या व्यापारी सत्रात, नॅसडॅकने ०.९८ टक्के, निक्केई २२५ ने ०.९४%, एफ.टी.एस.ई. १०० ने ०.८५% आणि एफ.टी.एस.ई. एम.आय.बी.ने १.०० ची वृद्धी घेतली तर हँगसेंगने ०.४५% ची घसरण अनुभवली.