खुडूस: माळशिरस तालुक्यातील वेळापूर खुडूस दरम्यान लगून साईट शिवामृत पाठीच्या वेळापूरच्या बाजूकडे ईरटीका कार आणि सिमेंट भरलेला टँकर यांचा समोरासमोर भीषण अपघात होऊन ईरटीका कार मधील चार ते पाच महिला व पुरुष जागीच ठार झालेले आहेत. एक लहान मुलगी दवाखान्यात पाठवलेली आहे. हे त्या गाडीमधील दोन महिलाही गंभीर जखमी असून त्यांनाही ही दवाखान्यात नेहलेले आहे घटनास्थळी स्थानिक लोकांनी सहकार्य करून तीन व्यक्तींना बाहेर काढले दरम्यान वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याने वेळापूर पोलीस स्टेशनची ही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झालेले आहेत.

टँकर व ईरटीका कार यांचा एवढा भीषण अपघात झाला त्याठिकाणी मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा रक्ता माणसाचा सडा गाडीमध्ये दोन मिनिट पडलेला होता त्याठिकाणची विदारक परिस्थिती पहावत नव्हती एवढी भयानक अपघाताची भीषणता होती गाडीच्या क्रमांक MH 13 CG 55 99 असा असल्याने गाडी ही सोलापूर पासिंगची आहे त्यामधील प्रवास करणारे वैराग बार्शी येथील असल्याचे समजले संबंधित व्यक्तीच्या मोबाईल बाहेर पडलेल्या होते.

त्यावरून त्यांनी डायल केलेल्या नंबरला फोन केल्यानंतर स्थानिक लोकांना माहिती मिळालेली होती सदरच्या ईरटीका कार मधील व्यक्तींचे नातेवाईक मंत्रालयामध्ये उच्चपदस्थ असल्याचे समजते पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशन करीत आहे संबंधित माहितीसाठी वेळापूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.