मुंबई : यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या आणि एटीकेटी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतल्या जातील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यावेळी दहावी आणि बारावीच्या नापासांच्या परीक्षांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असं त्या म्हणाल्या.