सोलापूर : दक्षिण सोलापूरातील वांगी परिसरातील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार ग्वाल्हेर येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या कामगाराच्या संपर्कात एकूण 56 व्यक्ती आले होते. त्यापैकी 47 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामध्ये वांगी परिसरातील 37, कामती येथील सहा जणांचा व बोराळे येथील चार अशा एकूण 47 जणांचा समावेश असून या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी रात्री आयसोलेशन वॉर्डात दाखल केलेल्या वांगी परिसरातील 9 जणांचा अहवाल अद्याप प्रलंबित असून हा अहवाल शनिवारी मिळेल माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.