थोर समाजसेवक तथा शिक्षण महर्षी दलितमित्र बंजारा कोहीनूर स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचे ३ जून रोजी प्रथम पूण्यस्मरण. मागास समाज सेवा मंडल नेहरुनगर या संस्थेच्या मार्फत त्यांनी ज्ञांनाचा वृक्ष लावला. आज त्या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.स्वर्गीय चंद्राम गुरुजीचे संपूर्ण जीवन दलित उपेक्षित शोषित यांच्या कल्याणासाठी गेले. अखिल भारतीय बंजारा सेवा संघ(A.B.B.S.S.) च्या माध्यमातून संपूर्ण बंजारा समाजासाठी त्यांनी केलेले कार्य बंजारा समाजाच्या सदैव स्मरणात आहे. अनेक तांडे गुरुजींनीं वसविले .त्यांच्या व्यक्तिमत्वावर संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रभाव पाहण्यात येत असे. गुरुजी नेहमी आपल्या संस्थेतील शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगत असत.
माणुस द्या,मज माणुस द्या.
असे भीक मागता प्रभू दिसला.
कुत्रे, डुकरे, दंबुक, शंभूक,
यांना शहाणे करण्याकरीता
माणूस हवा मजला.
तसेच…..ते सांगत
बोल तो ऐसे बोल के,
कोई न बोले झूठ,
बैठ तो ऐसी जगह बैठ,
के कोई न बोले ऊठ.
आपल्या राजकीय जीवना मध्ये विवीध क्षेत्रा मध्ये काम करत असताना नेहमी पारदर्शी व सहकार्याचे राजकारण त्यांनी केला. आपल्या सामाजीक जीवनामध्ये ते नेहमी ‘गिरते को ऊठाना,स्वर्ग मेरा’ अश्या पध्दतीने कार्य केले. आपल्या धार्मिक जीवनामध्ये त्यांनी समस्त मानवजातीचे कल्याण,प्रार्थना,आम्हाला अनुभवास मिळाले. त्यांच्या कार्याविषयी संपूर्ण लिहणे शक्य नाही. गुरुजी चालते बोलते विद्यापीठ होते.आज त्यांच्या स्मृतीस एक वर्ष पूर्ण झाले आम्ही ह्या महान व्यक्तिच्या सावलीतून पोरके झालो. त्यांचे शिकवण हिच आमची शिदोरी. आजच्या ह्या प्रथम पूण्यस्मरण दिना निमित्त विनम्र अभिवादन…. ईश्वर त्यांच्या आत्मास सदैव स्वर्गात ठेवो हिच प्रार्थना….