मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिव म्हणून बदली झाली. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. अविनाश ढाकणे, दीपा मुधोळकर आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणे…
ए. बी. मिसाळ यांची बदली विभागीय आयुक्त, कोकण विभाग येथे करण्यात आली आहे.
लोकेश चंद्र यांची नियुक्ती प्रधान सचिव, जलसंपदा विभाग येथे करण्यात आली आहे.
अंशु सिन्हा यांची बदली सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग येथे करण्यात आली आहे.
दीपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज्य प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.
एस. एम देशपांडे यांची नियुक्ती प्रधान सचिव या पदावर केली आहे.