येस न्युज मराठी नेटवर्क : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची १ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सुशातं सिंह प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.