अमिताभ बच्चन झाले भावूक
येस न्युज मराठी नेटवर्क : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटी दिलीप कुमार यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्या आधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर’ असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो” या आशयाचे ट्वीट करत अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिनेता अक्षय कुमार, सोनू सूद, जावेद जाफरी आणि इतर काही कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.