सोलापूर दि. 20 : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे आणि त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
हे ॲप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲंड्राइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टमवर उपलब्ध आहे. ॲप्लिकेशनच्या सहाय्याने आपण, आपले कुटुंबिय, मित्र यांना कोरोना विषाणूची बाधा होण्यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या ॲप्लिकेशनमध्ये दिला जाणारा वैयक्तीक माहिती अतिशय सुरक्षित ठेवला जाणार आहे. ॲप्लिकेशनचा वापर करुन कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत सेल्फ असेसमेंट, रिस्क असेसमेंट करु शकतो. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीएम केअर्स निधीमध्ये योगदान देऊ शकतो.
खालील लिंक ओपन करुन ॲप डाऊनलोड करुन घ्यावे.
Android :
http://play.google.com/store/
iOS :
http://app.apple.com/in/app/