- प्रशासन अजून किती दिवस करणार दुर्लक्ष?
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील तडवळ परिसरातील रस्त्यांची दुर्दशा बघून तेथील नागरिकांना प्रश्न पडला आहे कि तडवळचा वाली कोण आहे का नाही? गेल्या १० वर्षापासून जवळगी ते तडवळ हे रस्त्यावर हजारो खड्डे पडले आहेत. याचा त्रास या रस्त्यावरुन ये – जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना किंवा मोटारसायकल वर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना अपघात होण्याची भिती निर्माण होत आहे. रस्त्याची अवस्था खूपच बिकट झाल्याने वाहने तेथून जावू शकत नाही.
या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांच्यामुळे गरोदर महिलांना दवाखान्याला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.गेल्या पाच महिन्यापासून लॉकडाऊनच्यामुळे रेल्वे, एस्टी, बंद असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अक्कलकोट तालुक्याचे मा.आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी या रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा करुन तडवळ ,खानापुर,अंकालगे, सुलेरजवळगी,व अन्य गावातील नागरिकांच्या समस्या दूर करावे अशी मागणी तडवळचे सुनील चव्हाण व खानापुरचे युवा नेते शहानवाज दस्तगीर पटेल यांनी केले आहे.