माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांनी नुकतेच एक विधान केले. के प्रभू श्रीरामाचे मंदीर बांधून कोरोना जाणार नाही. त्यांना प्रभू श्रीरामाच्या नावाला विसर पडला आहे. प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री विक्रांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून प्रभू श्रीरामाचे जय श्रीराम लिहिले 10 लाख पत्रे खासदार शरदचंद्रजी पवार यांना पाठवण्यात येणार आहेत याचा आरंभ उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज पोस्ट कार्यालय येथे पत्रे टाकून करण्यात आल्याची माहिती युवा मोर्चा उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष माननीय श्री संभाजी दडे यांनी पत्रका द्वारे दिली. उत्तर सोलापूर तालुक्यातून हजारो पत्रे पवार साहेबांना पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती संभाजी दडे यांनी दिली. याप्रसंगी उपस्थित लखन गवळी अजय विटकर सुमित बोगे मनोज कोळी अंकुर चव्हाण विजय भंडारे आदी उपस्थित होते.