मोहोळ/दादासाहेब गायकवाड : कोवीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोवीड योध्दा रथयात्रा’ या कार्यक्रमास मोहोळ तालुक्यात सुरुवात झाली असून त्याअंतर्गत मंगळवारी (ता.१९) सय्यदवरवडे येथे गावातून हा रथ फिरवून ध्वनीक्षेपकावरून जनजागृती करण्यात आल्याची माहिती सरपंच धनश्री कोरे व ग्रामविकास अधिकारी दिपाली राऊत यांनी दिली.
कोवीड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुल आरोग्य
केंद्रांतर्गत सोमवारी (ता.१८) तांबोळे सौदणे आढेगांव टाकळी(सिं.) वरकुटे, औंढी, वडदेगांव, घोडेश्वर, अर्धनारी, अरबळी, मिरी, येणकी, इंचगांव, अंकोली, कोथाळे, शेजबाभुळगांव, नजिकपिपरी तर मंगळवारी (ता.१९) रोजी ढोकबाभुळगांव, सय्यद वरवडे, कुरुल, परमेश्वर पिंपरी, कातेवाडी, सोहाळे, वाघोली, कामती(बु), कोरवली, हराळवाडी, जामगांव(खुर्द), जामगांव(बु.), वटवटे, कामती(खु), लमाणतांडा, शिंगोली, तरटगांव, पिरटाकळी, सोहाळे, वाघोली, कामती(बु), कोरवली, हराळवाडी, जामगांव(खुर्द), जामगांव(बु.), वटवटे कामती(खु), लमाणतांडा, शिंगोली-तरटगांव, पिरटाकळी, शिरापुर(मो.), विरवडे (बु), दादपुर या गांवामध्ये कोवीड योध्दा रथयात्रेव्दारे जनजागरण मोहिम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेचे वेळपत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार रथाचे आगमन वरील गावामध्ये झाले. त्यापुर्वी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींना याबाबत अवगत करण्यात आले. तसेच ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्यसेविका यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
■ “रथ यात्रा गांवातील सर्व भागात फिरवून कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी जास्तीत जास्त जनजागरण करण्यात येत असून.नंतर पुढील गांवासाठी रथ मार्गस्थ करण्यात येत आहे.”
– धनश्री संजय कोरे सरपंच सय्यदवरवडे ता मोहोळ.
■ “सदर रथयात्रा तालुक्यातील संपूर्ण गावागावांत जाणार आहे. रथयात्रेच्या वेळी गावामध्ये कोणत्याही प्रकारे कलम १४४ चे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता घ्यावी व शिस्तीचे पालन होईल या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.”
– अजिंक्य येळे,गटविकास अधिकारी पंचायत समिती,मोहोळ.