• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’

by Yes News Marathi
April 18, 2020
in मुख्य बातमी
0
जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून प्रत्येक देश आपापल्या परीने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अशा परिस्थितीतही काही देश इतर देशांना मदत करत आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी अशा देशांना सलाम ठोकत त्यांचं कौतुक केलं आहे. भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असून अमेरिकेत त्याची पडताळणी केली जात आहे. अमेरिकेतील १५०० रुग्णांवर या औषधाचा वापर केला जात आहे. अमेरिकेनंतर इतर देशांनीही भारताकडे आम्हाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

“करोनाशी लढा देण्यासाठी सर्व जगात एकता निर्माण झाली पाहिजे अशी भावना संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. याचा अर्थ प्रत्येक देश जो मदत करण्यास समर्थ आहे त्याने इतर देशांना मदत केली पाहिजे. जे अशी मदत करत आहेत त्यांना आमचा सलाम आहे,” असं अँटोनियो ग्युटेरेस यांनी म्हटलं असल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते स्टीफन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे .भारत इतर देशांना औषधांचा पुरवठा तसंच इतर मदत पुरवत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

करोनाशी लढा देण्यासाठी इतर देशांमधून वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. केंद्र सरकारने ५५ देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.

Previous Post

सहकार क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील दुध व्यवसायाकडे लक्ष द्या : रणजितसिंह मोहिते-पाटील

Next Post

सिव्हील,अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित

Next Post
सिव्हील,अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित

सिव्हील,अश्विनी, यशोधरा डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल म्हणून निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group