सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील कोंडी(ता.उत्तर सोलापूर) गावाच्या शिवारातील बंडेवार दाळमिख कंपनीमधून पुणे येथे डिलेव्हरी करीता 85 बॅग प्रत्येकी 50 किलो व 200 बॅग प्रत्येकी 30 किलो असे एकूण 10 टन तुरदाळ ट्रक क्रं.एम.एच.45 डी.5596 मधून डिलेव्हरी साठी निघाला होता. तुरदाळने भरलेले ट्रक हे ड्रायव्हर गणेश गौतम शिंदे(रा.औढा, ता.मोहोळ) याने मध्येच अप्रामाणीपणे चोरी केल्याने जय हिंद ट्रान्सपोर्टचे मालक सतीश भगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश शिंदे याने मोडनिंब येथील राहणारे गुन्ह्यातील आरोपी सुजित पाटोळे, अरविंद ओहोळ, रोहिदास गुप्ते, जितु गुप्ते(रा.पुणे), दत्ता सरवदे यांच्या मदतीने पुणे येथे तुरदाळ विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले असून चोरीची तुरदाळ कमी भावाने विकत घेणारे पुणे येथील व्यापारी रोहित अगरवाल, सुभाष जोगदंडे, सुभाष अगरवाल यांना गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून इतर तपास चालू आहे. चोरीस गेलेल्या मालापैकी 73 नग 50 किलो वजणाचे व 191 नग 30 किलो वजणाचे तुरदाळीचे पोते जप्त करण्यात आले आहेत. 12 पोते विक्री केलेली 42 हजार 500 रूपये रोख रक्कम हस्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सपोनि अनिल देवडे, सपोनि माधुरी तावरे, पोसई दीपक दळवी, पो.ना.अनिस शेख, पो.ना.असिफ शेख, पो.कॉ.विक्रम शेळके, पो.कॉ.बसवराज अष्टगी, पो.कॉ.खंडु माळी, सायबर पोलीस स्टेशन मोहोळ, बार्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्यांनी सदरची कामगिरी पार पाडली.