येस न्युज मराठी नेटवर्क : आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. यात जखमी झालेल्या मदन शर्मा यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर आज केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवत, शिवसेनेवर टीका केली. शिवाय, मदन शर्मांवर अन्याय झाला असून, याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
“मदन शर्मा यांच्यावर एवढा हल्ला झाला, या प्रकरणी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु, सरकार त्यांचे असल्याने पोलिसांवर दबाव आणून साधारण केस दाखल केली. नौदलाच्या अधिकाऱ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे चांगली गोष्ट नाही. अशाप्रकारे गुंडागर्दी करणं शिवसेनेची सवय आहे.” असं आठवले म्हणाले.