येस न्युज मराठी नेटवर्क : १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेल्या गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र आता करोनामुळे दाऊदचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
गँगस्टर दाऊद इब्राहिम करोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, करोनामुळे दाऊदचा कराचीत मृत्यू झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, अनिस इब्राहिमने सांगितलं आहे की, “दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत”. यावेळी अनिसने संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानधून आपलं काम सुरु असल्याची कबुली दिली आहे. याआधी दाऊदच्या कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्यात आल्याचं वृत्त होतं.