येस न्युज मराठी नेटवर्क :उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी या गावात आदित्य आय केअर आणि लेसर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिरामध्ये गावातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नेत्र तपासणी करून घेतली. या शिबिरामध्ये एकूण 80 ते 90 लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी अधिक माहिती देताना ग्रामपंचायत सरपंच चंद्रप्रभा भास्कर यांनी असे शिबीर आम्ही वर्षातून एक-दोन वेळा राबवत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते