आमदारांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणात कोर्टाचा निकाल काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या बाजूने लागल्यास काय? याचा विचारही आता काँग्रेसने सुरू केल्याचे दिसते. त्यासाठी वेगळ्या पर्यायाची म्हणजेच प्लॅन बीचीही तयारी काँग्रेसने सुरू केल्याचे कळते. या प्रकरणावर सोमवारी होण्याची शक्यता आहे.
आपण कोणतंही पक्षविरोधी कृत्य केलं नसल्याचं सांगत सचिन पायलट गटानं गेल्या आठवड्यात काँग्रेसला कोर्टात खेचलं होतं. त्या प्रकरणावर उद्या सुनावणीची शक्यता आहे. या प्रकरणाचा निकाल कोर्टानं सचिन पायलट यांच्या बाजूने दिल्यास अधिवेशन बोलवण्याची तयारी असल्याचं काँग्रेसच्या लीगल टीममधील सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.
काय आहे रणनीती?
काँग्रेसचा दावा आहे की, अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री आपल्याकडील संख्याबळ सिद्ध करतील. कारण, काँग्रेसकडे तेवढं आमदारांचं संख्याबळही आहे. काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप काढला जाईल. त्यामुळे प्रत्येक काँग्रेस आमदाराला मुख्यमंत्री गेहलोत यांच्या सरकारच्या बाजून मत द्यावं लागेल.