सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. बुधवारी सोलापूरच्या ग्रामीण २४६० अहवाल जाहीर करण्यात आले. यातील २६६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर सोलापूर शहरात महापालिकेने ४५३ अहवाल जाहीर केले असून त्यातील ३६ जण कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. रुग्ण दाखल होण्याच्या प्रमाणापेक्षा बरे होण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आजवर १२३६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे तर शहर आणि जिल्ह्यात आजवर ३८ हजार ७२५ जणांना कोरोनाची लागण झाली होती यातील तब्बल २८६७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.