सोलपूर दि. 21. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पालक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या नऊ अधिका-यांची आज नेमणूक केली.
याबाबत जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या अधिका-यांना विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना पुढीलप्रमाणे 1) तालुक्यातील सर्व संबंधित अधिका-याकडून शासनाकडून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करुन घेणे. 2) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करणे 3) आरोग्य विभागाच्या मदतीने वैद्यकीय पथक तयार करणे 4) तालुक्यातील अद्ययावत माहिती द्यावी. 5) अफवा न पसरण्याची काळजी घ्यावी. 6) नागरिकात जनजागृती करावी.
तालुक्यासाठीचे पालक अधिकारी पुढीलप्रमाणे (नाव आणि तालुका याप्रमाणे) 1) . शैलेश सूर्यवंशी, विशेष भूसंपादन अधिकारी – उत्तर सोलापूर आणि बार्शी, 2) . दिपक शिंदे, विशेष भूसंपादन अधिकारी क्र. 1 – दक्षिण सोलापूर आणि अक्क्लकोट 3) अनिल कारंडे, विशेष भूसंपादन अधिकारी क्र. 3 – माढा 4) गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी (महसूल), – करमाळा 5) श्रीमती स्नेहल भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी – पंढरपूर 6) श्रीमती अरुणा गायकवाड, विशेष भूसंपादन अधिकारी सोलापूर क्र. 11 – मोहोळ 7) श्रीमती मोहिनी चव्हाण, जिल्हा पुनवर्सन अधिकारी – मंगळवेढा 8) किशोर पवार, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना – सांगोला 9) उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी – माळशिरस