सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचा-यांनी आपले एक दिवसाचे वेतन कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 12 लाख 21 हजार 253 रुपयांची मदत कर्मचा-यांनी दिली. बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे हा धनादेश सुपुर्द केला. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.